रविवार, 19 जुलाई 2020

Once Again - आज पुन्हा - Marathi Romantic Poem

0
आज पुन्हा...

girl-portrait-pyaarkiphilosophy


आज पुन्हा मनातली ती खोली उघडली
आठवणींवर थोडीशी धूळ साचली होती
पण पुन्हा त्यांना साफ करण्याचा उत्साह
मनाच्या एका कोपऱ्यात कायम होता.
बहुतेक अजून मनातून ती गेली नसावी
तिला कधी विसरताच आलं नाही
म्हणूनच आज तिची आठवण आली असावी...

आज पुन्हा माझ्या वाटेने नकळत
ह्या मनाला नेहमी सारखेच फसवले
पण पुन्हा कळून न कळण्याचा आनंद
मन अनुभवायला उत्सुक होतं.
बहुतेक अजून मनाला वेदना झाल्या नसाव्या
त्या वेदनांमध्येही प्रेम होतं
त्या जखमांवर खपल्या आल्या नसाव्या...

आज पुन्हा तिच्या घराकडे ती नव्हती
माझे डोळे नेहमी सारखेच पाणावले
पण पुन्हा पुढच्या वेळीची आस लागली
मन तिला पाहायला बेचैन होतं.
बहुतेक डोळेही तिच्यासाठी तरसले असावे
त्या विरहात पण गोडवा होता
त्या गोडव्यामुळे अश्रू बरसले नसावे...

आणि अश्या अवस्थेत हताश मनाला घेऊन आपण परतत असतो आणि अचानक ती दिसते...

आणि अचानक समोर ती दिसते
क्षणभरासाठी हृदयाचा ठोका थांबतो
पुन्हा चेहऱ्यावर एक हसू उमलतं
मन पुन्हा तिच्यावर फिदा होतं.
बहुतेक अजून आमचा नातं नशिबानं पुसलं नसावं
तिने तर अबोला धरलाच होता
तिचं मन माझ्यावर रुसलं नसावं...

अशी अचानक ती दिसल्यावर
पुन्हा तिच्या अवतीभवती घुटमळतो
तिची एक नजर मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो
ती नजर आणि मन तिच्याचसाठी कावरंबावरं होतं.
बहुतेक अजून माझा जीव तिच्यात अडकला असावा
म्हणून तिच्यासाठी हा शब्दांचा सागर आज भडकला असावा...

- वैभव शिवाजी भोकसे


या कवितेची आमची व्हिडिओ आवृत्ती पहा
Author Image

About Tushar T. Dalvi
I am a creative writer and Theatre Professional by occupation with more than 8 years of Experience. Here are some of my creations that talk about Love and other philosopies of life. I hope you will like what you read here. Enjoy!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Please do not enter any spam links in comment box.