रविवार, 19 जुलाई 2020

Little Help - Marathi Version - थोडी मदत

0

थोडी मदत


two-friends-pyaarkiphilosophy


    सूरजने रस्त्यावरुन जाताना पाहिले की एक मुलगा रस्त्यात आपल्या वस्तू घेऊन जात असताना तो खाली पडला व वस्तू खाली पडल्या. सूरज त्याला त्याचा भारी सामान त्याच्या घरी नेण्यास मदत करतो कारण ते दोघे एकाच रस्त्यावरुन जात असतात.


    सोबत चालत असताना सूरजला समजले की त्या मुलाचे नाव पुरब आहे आणि हे देखील समजले की त्या दोघांच्या ही आवडी आणि छंद समान आहेत. सूरजला हेही समजले की पुरब अनाथ आहे आणि त्याच्या मैत्रिणीने दुसर्‍या एका मुलाशी नुकतेच लग्न केले. पण त्याच्या लक्षात आले की काहीतरी आहे जे पुराब लपवण्याचा प्रयत्न करीत आहे.

    ते दोघे आधी पूरबच्या घरी पोहोचतात आणि सूरजला आत बोलावले जाते. ते दोघे खेळ, आवडीचे कार्यक्रम, चित्रपट, गाणी, बँड इत्यादीबद्दल बोलत छान वेळ घालावतात. सूरजला पूरबच्या वागण्यातून बदल जाणवतो, तो अधिक आनंददायक आणि उर्जावान आहे. या दिवसा नंतर, ते दोघे भेटतच राहतात आणि ते एकाच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. डिनर आणि फुटबॉल गेम्ससाठी ते सतत बाहेर जात असतात आणि भेटत असतात. 3 वर्षांचा कालावधी जातो आणि पदवीचा दिवस येतो.

friendship-philosophy


    या दिवशी, पूरब सूरजला विचारतो की आपण पहिल्यांदा भेटलो तो दिवस आठवतो का आणि त्या दिवशी तो इतके सामान का घेऊन जात होता. सूरज होकारार्थी मान हलवतो आणि विचारतो की आज हे महत्वाचे का आहे?


    तो पुढे सांगतो कि त्याने त्या दिवशी आपले दुकान, घर साफ केले आणि आईच्या झोपेच्या गोळ्या घेऊन निघाला.. तो कड्यावरून उडी मारुन आपले आयुष्य संपवणार होता. परंतु तो चुकून सूरजला भेटला, त्याच्यासोबत त्याने चांगला वेळ घालवला, हसला आणि छंद, आवडी विषयी गप्पा मारल्या. पूरब सांगतो की जर त्या दिवशी त्याने स्वत: ला ठार मारले असते तर त्याने हे सुंदर क्षण गमावले असते. सूरजला म्हणतो की तू फक्त ते ओझे उचलले नाही परंतु निराशेतुन बाहेर आणलेस, माझा जीव वाचविला.


To read this article in English Click Here.
To read this article in Hindi Click Here. 


Source Credit: Internet



Author Image

About Tushar T. Dalvi
I am a creative writer and Theatre Professional by occupation with more than 8 years of Experience. Here are some of my creations that talk about Love and other philosopies of life. I hope you will like what you read here. Enjoy!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Please do not enter any spam links in comment box.