2 Marathi Poems about Life and Literature
Two poems about life and literature. Poem about love for words and a poem about the struggles of life. Read these simple yet intriguing poems and share them with your friends and family on Facebook, Instagram, and WhatsApp.
मी शब्द सका
मी शब्द सका,
साब्दानी विणतो,
मी माझे काल्पनिक भाव.
शोधतो प्रेरणा,
मी सैरावैरा.
मी शब्द सका.
शोधतो प्रेरणा,
कल्पनेच्या गरुडाचे
पंख होईल अशी.
उंच भरारी घेऊन,
गगनाला भिडतील अशी.
मग, सबद होतील वारा,
भर भर पंखातून वाहणारा.
भावना देईल गती,
मार्मिक ढगांना भेदणारी.
मान होईल आसमंत.
विचार होतील करडे ढग.
त्या हृदयाच्या वेदना ,
जणू होतील, इंद्रधनुचे सातहि रंग.
पराभवाचा होईल पाऊस.
भिझेल अस्तित्वाची कोरडी जमिन.
नवा प्रेरणेचे अंकुर फुटतील,
शोधतो मी प्रेरणा अशी.
शोधतो प्रेरणा,
मी सैरावैरा.
मी शब्द सका.--Tushar Dalvi
03-08-2015 05.00pm
व्याथा हि संघर्षार्ची...
एक लढा स्वतःचा स्वतःशी,
व्याथा हि संघर्षार्ची
आठवणींच्या जाळ्यातून, मुक्त होण्याची,
मनाला दगा देण्याच्या, बालीश प्रयत्नांची
आणि तरीही भरुन येनाऱ्या डोळ्यांची
एक लढा स्वतःचा स्वतःशी,
व्याथा हि संघर्षाची
प्रवहा विरुधा वाहण्याची,
स्वतःला सिद्ध करण्याची,
आणि वाटेत, सुटलेल्या हातांची
एक लढा स्वतःचा स्वतःशी,
व्याथा हि संघर्षाची
समाजाच्या रुढी मोडू पाहण्याची
जीद्द, स्वताचे स्वप्न साकारण्याची,
आणि त्यासाठी "स्वार्थी" ठरण्याची
एक लढा स्वताच स्वताशी,
व्याथा हि संघर्षार्ची
Tushar Dalvi - 27-10-2014 2.26am
Good One. Keep It Up.
जवाब देंहटाएं