![]() |
| Falling in Love Again |
पुन्हा एकदा नवा जोश,
नवतारूण्य, उमंग जागवलंयस.
पुन्हा एकदा...
एकटेपणा पासून दूर केलंयस
मनाला बोलक केलंयस
डोळ्यांन मध्ये तेज उमटलंय
उतेजीत मेंदू रसायन उजळतंय
पुन्हा एकदा...
पुन्हा एकदा तोच अट्टहास
पुन्हा एकदा तीच घालमेल
पुन्हा एकदा तीच अधीरता
पुन्हा एकदा ते विरस
आणि त्याचा वेदना
पुन्हा एकदा...
पुन्हा एकदा मनाने गोधळ मांडलाय,
सगळ्याचा विसर पडलाय,
लक्ष्य हरवलंय,
सवयी, बदल्या आहेत,
काही नव्या लागल्या आहेत.
पुन्हा एकदा...
बेधुंद नशा चडलीये,
सैरावैरा, बेभान झालो आहे.
रोमांच अंगात भिनभिनतंय,
नासा नसात उफळतोय प्रणय,
पुन्हा एकदा...
पून्हा एकदा ते वाट पाहणं
पुन्हा एकदा ती बेचैनी
पुन्हा एकदा तोच रोमांच
पुन्हा एकदा ते क्षण मंदावणे
आणि ते नीरस काळ
पुन्हा एकदा...
Tushar T. Dalvi
(16 May 2018 15:00hrs IST)
