मी एकटा
मी एकटा एकांतात,
एकाकी अटवतो,
आपले एक एक क्षण.
तुझ्या गपा,
तुझ्या गोष्टी,
तुझे हसणे ,
आणि फक्त तुझेच स्वर.
तुला विसरू पाहतो,
तुझ्या आठवणी दूर करतो,
फार प्रयत्न करतो,
तरी हि नेहमी मीच हरतो.
या एकटेपणाला घाबरतो,
खूप खूप त्रास होतो,
आठवाणीन मध्ये बुडून जातो,
गुदमरतो,
जीव जातो,
तरी हि एकांतात तुझ्यातच हरवतो.
कधी कधी गर्दीत असलो तरी एकटाच असतो,
डोळ्यांनी आसपासच्या सगळ्यांना पाहत असतो,
मानाने मात्र तुटून पडलेल्या पाकळी सारखा,
फुलण्या आधीच कोमेजलेला असतो.
डोळे हसरे,
गाल ठाव ठवीत,
चेहरा मुखवटा सजवतो,
दुख मनाचे सुरेख लपवतो.
आणि मी,
एकटा एकांतात,
एकाकी अटवतो,
आपले एक एक क्षण.
-Tushar Dalvi 3 Jan 2012 IST 3.00am
रिंगण
पुन्हा एकदा त्याच वळणावर.
आयुष जणू रिंगण झले आहे.
त्याच चुका, त्याच वेदना,
तेच अनुभ पुन्हा पुन्हा.
वाट खडकाळ.
भेगार्लेले हृदय.
दुखाचे स्त्राव, आणि,
तोच एकटेपणा पुन्हा पुन्हा.
अपेक्षांचा व्यास.
खडी निराशांची.
उंच अहंकाराचे डोंगर, आणि,
तेच वाद, पुन्हा पुन्हा.
नव्या परिचयाचे बीज.
आकर्षणाचे अंकुर.
असंक्या वाय्द्यांचे मोहर, आणि,
तोच सराव, पुन्हा पुन्हा.
पुन्हा एकदा त्याच वळणावर.
त्याच चुका, त्याच वेदना,
तेच अनुभ पुन्हा पुन्हा.
Tushar Dalvi – 05-08-2015 2.36pm IST

