नेहमी सारखाच बसलो होतो लॅपटॉप समोर,
ऑर्कुट वर लॉग इन
झालो, म्हाटलो,
घ्यावी थोडी मित्रांची खबर बात,
Home Page समोर येताच,
एक स्क्रॅप पॉप अप झाला,
स्क्रॅप होता "तिचा",
म्हणे testimonial पाठव नाहीतर तुझी खैर नाही
आगदी घाबरुन गेलो,
नाही तिने दिल्याल्या धमकी मुळे नाही,
तर...काय लिहावा बर,
याचा विचार करण्यात वेळ जाईल
म्हटलं करवी तिची मस्करी
तिला चिडवून
उगीचच कहितरी लिहू
थेट गेलो तिच्या प्रोफाइल वर
Write testimonial वर टिचकी मारली
सामोरच्या कोऱ्या चोकोनात तो टिम टिमणारा पॉईंटर
जनू शब्दांची वाटच पहाट होता
कसा चिडवावं, काय लिहावं
याचा विचार करताना मेंदू अगदी निकामी झाला
पण ह्रदयाचे ठोके मात्र वेगावले
बऱ्याच गोष्टी, बऱ्या च आठवणी,
लॅपटॉपच्या स्क्रीन वर,
एखद्या चित्रपटा सारख्या दिसू लागल्या.
तिचा तो बालिश स्वभाव,
हसनं, खिदळनं,
बिंदास्त समजाची पर्वा न करता वावरण
तिचे सुखं, दुखं,
भूतकाळ, वर्तमान, भविष्य,
अगदी मोकळे पणाने सगळ शेयर करणं
तिचा दिलखुलास, मोकळा स्वभाव,
अगदी आपलसं करुण टाकणरी जवळकी
अशी की सहज कोणी ही प्रेमात पडावं
माझा झालेला गैरसमज,
मी केलेली चुक,
आणि हळू हळू आमच्यातला वाढत गेलेला दुरावा,
तेव्हा झालेला पश्चाताप,
त्यानंतर आठवणीतले ते दिवस,
आणि गमावलेली ती घट्ट मैत्री.
पाहता पाहता,
तो टिम टिमणारा पॉईंटर,
शब्द काउंटरच्या शुन्यावर येउन ठेपला.
भावनांच्या वादळातुन बाहेर पडलो,
पाठवावा,
पण बोट टच पॅड वर सरकेना.
विचार केला, खूप विचार केला,
ह्रुदयाचे ठोके धिमावले,
मेंदू जागा झाला.
टच पॅड जवळ सरकलेले बोट,
बॅक स्पेस वर गेल,
मांडलेल्या भावना हळू हळू पुसून टाकत
प्रॅक्टिकल मेंदूने ठरवलेली चेष्टाच केली,
मैत्रीला मैत्रीच राहूदेत,
एक चिडवणारी, हसरी कविता लिहून सबमिट केली।
- तुषार दळवी. 19 मार्च 2010.