Love is one mysterious emotion, feeling, and state of mind that many philosophers have tried to decipher in their literature. Many poets have tried to explain the feeling in their poems be it in shayari's, kavita's, slam poetry's in Hindi, Marathi, or English. We all have been in love with someone sometime. We may have had success or heartbreaks. We may have used different ways to impress our love interests. So here is one such love, a romantic poem in Marathi that shows us how should one love.
प्रेम कसं प्रामाणिक असावं,
केलेल्या वाद्यांना पाळणारं,
नाती तुटली तरी कायम राहणारं,
काळाची सीमा नसलेलं, अमर असावं
प्रेम अस असावं
बालपणातलं प्रेम,
तरूणाइतलं प्रेम,
प्रौढ वयातलं प्रेम,
उतार वयातलं प्रेम,
असं वयोमर्यादित नसावं,
नुसतं निर्मळ मनाने केलेल असावं,
प्रेम अस असावं
बदल्यात प्रेम मिळवन्याची
भावना नसलेलं,
निरपेक्षित तपस्येसारखा असावं।
खंबीर होऊन,
संकटांना छातीठोक समोर जाणारं,
धाडसी असावं
प्रेम असं असावं
पराजयातही विजयी होणारं,
इतरांसाठी उदाहरण ठरणारं,
इतिहास घडवणार असवं,
प्रेम असं असावं
--- 27/09/14 2.42am.
