शनिवार, 8 अगस्त 2020

Mukesh Ambani's Reply to a Gold Digger - मुकेश अंबानींचे एका सुंदरीला उत्तर

0

 

मुकेश अंबानींचे एका सुंदरीला उत्तर

Gilr-ambani-pyaarkiphilosophy


पूजा चौहान नावाच्या एका सुंदर मुलीने रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांना पत्र लिहून अतिशय श्रीमंत व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मुकेश अंबानीने तिला उत्तर देऊन पैशाच्या मागे हपापलेल्या मुलींना त्यांची जागा दाखवून दिली.


त्या मुलीचे पत्र आणि मुकेशजीचे उत्तर सर्वांनी शेअर करावे असेच आहे. 


श्री मुकेशजी,

मी एक २५ वर्षाची तरुणी आहे. मी प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगते कि मी खूप सुंदर आहे आणि मला खूप स्टायलिश आणि ऐषारामी जीवन जगण्याची इच्छा आहे. त्यासाठी ज्या माणसाचे उत्पन्न वर्षाला १०० कोटी आहे केवळ त्याच्याबरोबरच मला लग्न करायचे आहे. तुम्ही मला लालची म्हणाल पण अलीकडे २ कोटी उत्पन्न खूपच middle class आहे असे मी समजते. त्यामुळे किमान १०० कोटी तरी उत्पन्न असायला हवे. तुमच्या ग्रुप मध्ये असा कोणी आहे का कि सगळे आधीपासून विवाहित आहेत. 


मी ५० कोटी इन्कम असलेल्या माणसाबरोबर डेटिंग केले आहे. परंतु माझी taste अजून उंची जीवन जगण्याची आहे. आणि लग्न करून न्यूयॉर्क शहराच्या अत्यंत आलिशान आणि खर्चिक अशा सिटी गार्डन भागात मला राहायचे आहे आणि त्यासाठी ५० कोटी इन्कम खूप कमी आहे.  कृपा करून मला उत्तर देऊन मार्गदर्शन करा. 


१) अतिशय श्रीमंत super rich लग्नाची मुले कुठे भेटतील? हॉटेल, बार, क्लब्स अशा ठिकाणची नावे आणि पत्ता मला प्लीज सांगा. 

२) कोणत्या age group मधील पुरुष ठीक राहतील. 

३) बहुतेक श्रीमंत लोकांच्या बायका ह्या सुंदर नाहीत, अतिशय साधारण आहेत. मी अशा कांही मुलींना भेटले आहे कि त्या मुळीच सुंदर, सेक्सी नाहीत, स्मार्ट नाहीत तरी त्यांनी श्रीमंत पुरुषांना गटवले आहे. 

४) मी अनेक श्रीमंत व्याकिंची गर्ल फ्रेंड म्हणून राहिले आहे पण मला आता लग्न करायचे आहे. 


आपली.

पूजा चौहान 



मुकेश अंबानींचे उत्तर. 

कु. पूजा. 


मी तुझे पत्र काळजीपूर्वक वाचले. तुझ्या सारख्या अनेक मुलींना देखील असेच प्रश्न पडले असतील असे मला वाटते. एक व्यवसायिक गुंतवणूकदार म्हणून मी तुझ्या परिस्थितीचे विश्लेषण करू इच्छितो. 


माझे वार्षिक उत्पन्न १०० कोटीच्या पुढे आहे म्हणजे मी तुला पाहिजे असलेली व्यक्ती आहे असे म्हणायला हरकत नाही आणि त्यादृष्टीने मी काही टाईमपास करणार नाही. 


एक बिझनेसमन म्हणून तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय हा वाईट आणि चुकीचा निर्णय ठरेल असे मला वाटते. थोडे स्पष्ट करून लिहितो. 


तपशील थोडा बाजूला ठेवू यात. तुझी ऑफर अशी आहे कि, तू पैश्याच्या बदल्यात सौंदर्य एक्स्चेंज करणार आहेस. “अ” व्यक्ती ही सौंदर्य देणार आणि “ब” व्यक्ती ही त्याच्या बदल्यात पैसे मोजणार. इथपर्यंत सौदा ठीक आहे. पण एक गंभीर समस्या पुढे आहे. तुझे सौंदर्या हे वयाबरोबर कमी कमी होत जाणार आहे परंतु माझे पैसे मात्र वाढणार आहेत. खरंतर माझे पैसे दर वर्षी वाढत जातील पण तुझे सौंदर्य आणि तारुण्य यात काही वाढ होणार नाही. उलट ते कमी होणार आहे. 


म्हणून, अर्थशास्त्राच्या दृष्टीने मी म्हणजे वाढत जाणारी Asset आहे तर तू म्हणजे घसरत जाणारी (depreciating) Asset आहे. जर सौंदर्य हीच तुझी एकमेव गुणवत्ता किवा asset असेल तर पुढील १० वर्षात त्याची किंमत प्रचंड कमी होणार आहे. आणि जर शेअर बाजाराच्या भाषेत सांगायचे झाले तर तुझ्याबरोबर डेटिंग करणे ही एक व्यावहारिक परिस्थिती (trading position) आहे आणि कालांतराने जर त्या व्यवहाराचा बाजार भाव कमी झाला तर तो व्यवहार दीर्घकाळ चालू ठेवणे शहाणपणाचे ठरत नाही. हेच तत्व तुझ्याबरोबर लग्नाला देखील लागू पडेल. हे म्हणणे थोडे दुष्टपणाचे होईल पण ज्या asset ची किंमत घसरणार आहे ती लवकरात लवकर विकून टाकणे हे केंव्हाही श्रेयस्कर ठरते. 


१०० कोटी उत्पन्न असणारा माणूस मूर्ख असत नाही. तो एकवेळ तुझ्या बरोबर डेटिंग करेल पण लग्न करण्याचा मूर्खपणा करणार नाही. त्यापेक्षा तू स्वतःच प्रामाणिक मार्गाने १०० कोटी कमावण्याचे प्रयत्न का करीत नाहीस. मला वाटते एखादा मूर्ख श्रीमंत शोधण्यापेक्षा ही नक्कीच सोपे आहे आणि चांगले आहे. 


माझ्या उत्तराने तुझे समाधान झाले असेल, अशी मी आशा करतो. 

तुझा हितचिंतक 

मुकेश अंबानी



Source Credit - Internet - Anonymous

Author Image

About Tushar T. Dalvi
I am a creative writer and Theatre Professional by occupation with more than 8 years of Experience. Here are some of my creations that talk about Love and other philosopies of life. I hope you will like what you read here. Enjoy!

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Please do not enter any spam links in comment box.